
रोखठोक मराठी न्यूज
चाकण: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी चाकण येथे जनजागृती व केवायसी (KYC) अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या अभियानाला परिसरातील शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.अभियाना दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेची उद्दिष्टे, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच आधार प्रमाणीकरण आणि KYC प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाच्या सूचनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण व KYC प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले तसेच ऑनलाइन प्रक्रियेसाठी आवश्यक मदतही उपलब्ध करून देण्यात आली.
विशेष म्हणजे, मोरया डिजिटल हब, चाकण यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना KYC, आधार प्रमाणीकरण तसेच विविध ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून, यामुळे लाभार्थ्यांना प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलदगतीने पूर्ण करता येत आहे.
अभियानामुळे शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी जागरूकता वाढली असून, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले. यावेळी आपले सरकार सेवा केंद्र चालक नयन राजेश देवकर व चाकण विविध कार्य विकास सोसायटी लिमिटेड चाकण चे सचिव अरुण धाडगे, शेतकरी बांधव उपस्थित होते.