
रोखठोक मराठी न्यूज
जुन्नर : अनुसूचित क्षेत्रातील वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती जुन्नरच्या वतीने वनहक्क समिती व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन (CFRMC) समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.24 सप्टेंबर 2026 रोजी पंचायत समितीच्या सभापती कमलताई शेळकंदे या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जुन्नर तालुक्यातील आदिवासी गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनहक्क समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य सहभागी झाले.
कार्यशाळेत वनहक्क दावे, सामुदायिक वनहक्क, ग्रामसभेचे अधिकार, वनसंपत्तीचे व्यवस्थापन व वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी डॉ. अमोल वाघमारे (सचिव, आदिम संस्था) यांनी वन हक्क कायदा 2006, सामूहिक दावे दाखल करण्याची प्रक्रिया व पुढील नियोजन याबाबत सविस्तर मांडणी केली. श्री. किरण लोहकरे (सदस्य, विभागीय वनहक्क समिती, पुणे विभाग) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी प्रतिक चन्नावार (गटविकास अधिकारी,जुन्नर) मा.विठ्ठल भोईर.(माजी सहा. गटविकास अधिकारी) तुकाराम लोहकरे (ता.प्र.समन्व्यक,पेसा) , प्रशांत इखार (यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई), दत्ता गवारी, ऍड ललित जोशी, सोमनाथ निर्मळ, संजय साबळे, श्री.लक्ष्मण जोशी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामपातळीवर वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, सामुदायिक वनसंपत्तीचे संवर्धन व व्यवस्थापन याबाबत सहभागी सदस्यांमध्ये अधिक स्पष्टता निर्माण झाली.तसेच सुधारित वनहक्क दावे दाखल करण्याबाबत उपस्थितांना असलेल्या शंका बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.