
रोखठोक मराठी न्यूज, आळंदी प्रतिनिधी :- महाराष्ट्रभर पावसाचा कहर चालू असताना आळंदीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्वात मोठा महापूर हा इंद्रायणी नदीला आला.
झाडे घर,जनावरे काही शिल्लक राहिले नाही. आळंदीमध्ये पाण्याची लाईन तसेच स्ट्रीट लाईटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गावठाणा मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत आहे. सर्व गावांचा संपर्क तुटला आणि तरीही अशा परिस्थितीमध्ये आषाढी वारी सोहळा होत मोठ्या आनंदाने होत आहे.
माऊलींच्या वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वारकरी गडकरी दिंडेकरी मोठी निराशा होते की काय असे वाटत होते. राहुट्या लावायला जागा नाही. सर्वत्र चिखल आहे. प्यायला पाणी नाही. विसाव्याला जागा नाही. आणि अशाही परिस्थितीमध्ये वारकऱ्यांचा आनंद मात्र कुठे कमी झालेला दिसून येत नाही. जणू काही झालेच नाही असा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ही माऊलीच्या भेटीची ओढ आहे.
ज्ञानोबा माऊलीचा गजर करत मृदुंगाच्या तालावर वारकरी तहानभूक विसरून ठेका घेताना दिसत आहे. संपूर्ण आळंदी मध्ये वारकरी भक्ती भावाचे वातावरण झालेले आहे.आणि इंद्रायणी नदीच्या इतिहासात सर्वात मोठा महापूर आला आळंदीच्या पिण्याच्या पाण्याची शृंखला तुटली याचा जणू विसरत पडला आहे. कारण माऊलीच्या भक्तीची ओढ आणि तुकोबारायांच्या भक्तीरसातला आलेली ही नगरी आहे. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणून चला आळंदीला जाऊ ..ज्ञानदेव डोळा पाहू ..या भावनेत वारकरी भक्ती रसाने भिजले आहेत.