दिव्य सोहळा पाहुनी डोळा.. देह हा माऊली माऊली झाला. माऊलींच्या आळंदीत वारकऱ्यांची मांदियाळी

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

प्रतिनिधी आळंदी : माऊलींची आळंदी महापुराच्या पाण्याने भरलेली असली, तरीही देह मात्र माऊली माऊली च्या ओढीने आळंदी कडे रवाना होत आहे. आळंदीच्या वाहतुकीच्या चारही पुलावरून पाणी गेले. पोलीस प्रशासन, देवस्थान आणि नगरपरिषद यांनी वारकऱ्यांना भाविकांना आळंदीत वारीसाठी न येता पुण्यातून सहभागी व्हावे. अशी आवाहनही केले.मात्र माऊलीची ओढ आणि विठुरायाच्या भेटीची आशा ही मात्र भक्तांना सर्व आव्हाने पार करत आळंदीकडे आणत आहे.

दरवर्षीप्रमाणे वारकरी भाविक यांची मांदियाळी आळंदी मध्ये दिसून येते.ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर कर पावले आळंदी कडे वळतात आणि देहभान विसरून ,भूक तहान विसरून, माऊलीच्या भक्तीरसात दंग होताना दिसत आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ही पालखी सोहळा सुरळीत पार पडावा म्हणून चिंताग्रस्त तर आहेच ,मात्र अशाही परिस्थितीमध्ये पंढरीपर्यंत वारकरी कुठल्याही चिंते शिवाय …. हा सुख सोहळा स्वर्गी नाही …..याचा अनुभव घेण्यासाठी तयारीत आलेल्या दिसून येते.ना राहुटीची सोय, ना पाण्याची सोय, ना मुक्कामाची व्यवस्था, तरीही चेहऱ्यावर हास्य. आणि माझ्या विठुरायाचे नाव घेत .आनंदाने नाचणारा हा वारकरी….. वारकरी सांप्रदायाची अभेद्य भक्ती दाखवत आहे. आळंदी मध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी जमा होत आहे.

थोड्याच वेळात माऊलीं आळंदी तून प्रस्थान करणार आहेत.आणि आजोळ घरी मुक्कामानंतर पंढरीची वारी सुरू होणार आहे .याचा आनंद,भूक तहान विसरून .वारकरी आनंदाने तयारी करत व्यक्त करत आहेत.म्हणूनच म्हणतात …हा सुख सोहळा स्वर्गी नव्हे… याची प्रचिती आळंदीत महापुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा येताना दिसते. अनेक संकटांना तोंड देत वारकरी आळंदी पर्यंत पोहोचला आणि डोक्यावर तुळशी वृंदावन ओठावर विठूचे नाव आणि मनात विठुरायाची भेटीची आशा या भावनेने ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये मृदुंगाच्या तालावर नाचत हा वारकरी पंढरीला जाणार आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *