दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; सहलीवर आलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

रोखठोक मराठी न्यूज

(प्रतिनिधी आफरीन शेख) विनर्स अकॅडमी या आळंदीतील दत्त मंदिर रोडवर असणाऱ्या अकरावी बारावीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे आळंदीतील पोलीस स्टेशन जवळील चऱ्होली रस्ता दत्त मंदिर रोड कॉसमॉस बँकेजवळ मोठ्या प्रमाणात आळंदीकर नागरिक जमा झाले असून या दुर्दैवी घटनेची हळहळ व्यक्त करत आहेत.

पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण आळंदी परिसरात आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार आळंदी परिसरातील अकरावी बारावी मध्ये शिकणारे कॉलेजचे काही विद्यार्थी पर्यटनासाठी आणि फिरण्यासाठी दिवेआगर येथे आले होते.समुद्राचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी पाण्यात उतरले, मात्र समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा योग्य अंदाज न आल्याने आठ विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात वाहून गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला.

सदर दुर्दैवी घटनेची माहिती मिळतात स्थानिक वॉटर स्पोर्ट्स मालकाच्या तत्परतेने मृतदेह स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या सहाय्याने दिवेआगर येथील भाऊ मारुती साळुंखे महाकाली हॉटेल स्पोर्ट चे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात शोध घेत आपल्या जीवाची परवा न करता भाऊ साळुंखे व त्यांच्या टीमने अथक प्रयत्नानंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत . रायगड पोलीस आणि प्रशासनाची घटनास्थळी धाव घेत दुर्घटनेची माहिती मिळताच दिवे सागरी बोरली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे आपल्या पोलीस टीम्सह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतल्या असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी बोरली पंचतंत्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले आहे या दुर्दैवी घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत आणि पर्यटनाच्या काळात घडलेल्या दुःखद घटनेने दिवेआगर व परिसरात अत्यंत शोकाकुल वातावरण पसरले आहे.

आज दिनांक 01.10.2026 रोजी आळंदी, येथील विनर्स अकॅडमी फॉर 11th अँड 12th या अकॅडमीचे 25 मुले, 17 मुली व 06 शिक्षक असे एकूण 48 विद्यार्थी व शिक्षक सागरी , दिवेआगर येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. त्यातील 08 विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर पोहत असताना बुडाले असून ते 08 ही विद्यार्थी मिळून आलेले आहेत. व ते 08 विद्यार्थी मयत झालेले आहेत.

मृत मुलांची नावे खालीलप्रमाणे1. तन्मय दत्तात्रय वहीले2. सुमित भरत अहिरे3. प्रणव रामदास बनसोडे4. कैवल्य सतीश वासनकर5. राजवीर युवराज वहीले6. यश किरण वानखेडे7. सोहम तुकाराम भांडवलकर8. कौस्तुभ संदीप दौंडसर्व जण वय 16 वर्षे, राहणार आळंदी, पुणे या दुर्दैवी घटनेचा सावट संपूर्ण आळंदी शहरात पसरले आहे या घटनेमुळे सुन्न करणारी घटना म्हणून आळंदीतील ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे याबाबत मनाला सुन्न करणारा असा मोठा जमाव विनर्स अकॅडमी आळंदी पोलीस स्टेशन जवळील या मुलांच्या क्लास जवळ मोठ्या संख्येने जमा झालेला आहे. शब्दही फुटत नाहीत अशी दुर्दैवी घटना घडल्याने या आठ मुलांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *