रोखठोक मराठी न्यूज
जुन्नर /(वार्ताहर ) जुन्नर नगरपालिकेचे दोन नगरसेवक व दोन नगरसेविकांचे पती यांच्यावर खंडणीप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने जुन्नर तालुक्यात राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहेयाबाबत मुकुंद रत्नाकर डोंगरे (५२)यांनी फिर्याद दाखल केली आहे .
जुन्नर शहरातील नंदनवन सोसायटीमध्ये 26 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान गाडेकर इंटरप्राईजेस कंपनीस ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची धमकी देऊन नगरसेवक प्रशांत सराईकर नगरसेवक वाजीद इनामदार तसेच नगरसेविका सना शफी मन्सूर यांचे पती सोहेल शेख आणि नगरसेविका अनुजा पातुरकर यांचे पती गणेश पातुरकर यांनी धमकी देऊन खंडणी वसूल केली आहे .
या आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम ३०८(२) ३५१(२) ३(५)प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे .गाडेकर इंटरप्राईजेस कंपनीला जुन्नर नगरपालिकेने कुशल व अकुशल कामगार पुरविण्याचे कंत्राट दिले होते .याबाबत अनेक तक्रारी निर्माण झाल्या होत्या .त्यामुळे नगरसेवक प्रशांत सराईकर नगरसेवक वाजिद इनामदार ,सोहेल शेख ,गणेश पातुरकर या आरोपींनी तुमची एजन्सी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकू अशी धमकी देऊन या एजन्सीचे मॅनेजर मुकुंद डोंगरे यांच्याकडून चार लाख रुपये खंडणी वसूल केली होती.गाडेकर इंटरप्रायझेस कंपनीचे मँनेजर मुकुंद डोंगरे यांनी सोमवारी रात्री उशिरा फिर्याद दिली होती.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही,पोलिस निरिक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक महेश गायकवाड अधिक तपास करत आहेत.