विद्युत डीपी चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने ठोकल्या बेड्या; १६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज,पिंपरी-चिंचवड : आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद परिसरातील विद्युत डीपीमधील तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा, युनिट-३ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीच्या तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या तारांसह एकूण १६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून विद्युत डीपी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू होता.३ सप्टेंबर २०२६ रोजी तपास सुरू असताना पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत विद्युत डीपीमधील तारा चोरी करणारे काही संशयित भानोबाची कोयाळी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून अक्षय बाबासाहेब काळे (वय ३४) आणि राहूल दिनकर पोकळे (वय २०) यांना ताब्यात घेतले.

चौकशीत दोघांनी ललित मगर ऊर्फ नेपाळ याच्यासोबत मिळून विद्युत डीपीमधील तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या तारा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीचा माल भानोबाची कोयाळी येथील भंगार व्यावसायिकांना विकल्याची माहितीही त्यांनी दिली.त्यानंतर पोलिसांनी ईजहार इस्माइल चौधरी (वय ४०) आणि ब्रिजमोहन असर्फीलाल प्रजापती (वय ३०) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आळंदी, मरकळ, भानोबाची कोयाळी आणि वडगाव घेनंद परिसरातील विद्युत डीपीमधून चोरी केलेल्या ५ लाख १० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या व अॅल्युमिनियमच्या तारा पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली तीन दुचाकी व चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आली.

या कारवाईत आळंदी आणि दक्षिण चाकण पोलीस ठाण्यांतील विद्युत डीपी चोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आले असून, या गुन्ह्यांतील चोरीस गेलेला १०० टक्के माल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.उघडकीस आलेले गुन्हे1. आळंदी पोलीस ठाणे गुन्हा क्र. २२६/२०२५2. आळंदी पोलीस ठाणे गुन्हा क्र. ५६३/२०२५3. आळंदी पोलीस ठाणे गुन्हा क्र. ११३/२०२५4. आळंदी पोलीस ठाणे गुन्हा क्र. ८६/२०२६5. दक्षिण चाकण पोलीस ठाणे गुन्हा क्र. ७९/२०२६6. दक्षिण चाकण पोलीस ठाणे गुन्हा क्र. १३/२०२६7. दक्षिण चाकण पोलीस ठाणे गुन्हा क्र. १८/२०२६यातील आळंदी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेचे कलम ३०३(२) व भारतीय विद्युत कायदा कलम १३६, तर दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यांमध्ये भारतीय विद्युत कायदा कलम १३६ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, ऋषीकेश भोसुरे, युवराज बिराजदार, सागर सूर्यवंशी, सचिन गोनटे, बाळासाहेब खेडकर, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, निखील फपाळे, नितीन गुंजाळ, शशिकांत नांगरे आणि बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने ही कारवाई केली.विद्युत डीपीमधील मौल्यवान धातूंच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने या कारवाईमुळे परिसरातील विद्युत डीपी चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *