रोखठोक मराठी न्यूज
जुन्नर /(प्रतिनिधी ) जुन्नर शहरातील अहिल्याबाई होळकर शाळेच्या मैदानावर रात्रीच्या वेळी पोलिस गस्त घालत असताना संशयास्पद हालचाल दिसून आल्याने चौकशी करता इनोव्हा कारमध्ये ३किलो गांजा सापडला ,३आरोपी पळून जात असताना एका आरोपीस अटक करण्यात यश आले.
याबाबतची हकिकत अशी की ,रविवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना नगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर शाळेच्या मैदानावर संशयास्पद हालचाल दिसून आल्याने अधिक चौकशी करता तीन तरुण पळून जात असताना आरोपी मयूर संजय खराडे उर्फ सनी यास अटक केली . अन्य दोनजण फरार आहेत, फरार आरोपी निखिल परदेशी व असीम खलील कुरेशी आहेत.
पोलिसांनी पकडलेला आरोपी सनी उर्फ मयूर खराडे वय २७ यांच्याकडे अधिक चौकशी केली असता इनोव्हा गाडीत गांजा सापडला.आरोपी मयूर संजय खराडे वय -27 रा -कल्याण पेठ, जुन्नर ता -जुन्नर, जि -पुणे ,असीम खलील कुरेशी रा -शुक्रवार पेठ, ता -जुन्नर जि -पुणे,निखिल परदेशी (पूर्ण नाव माहित नाही )रा -प्ल्याटिनम हॉटेल चे बाजूला ता -जुन्नर, जि -पुणेआरोपी नं 2 व 3 फरार आहेत.
हवालदार हांडे व डायल 112कामी पोलिस वाघमोडे, चालक सातपुते हे रात्रगस्त करत असताना पावणे दोनच्या सुमारास अहिल्यादेवी होळकर शाळेच्या मैदानात एक चार चाकी व एक दुचाकी वाहन त्यांचा पाठलाग करून त्यातील एका इसमाला पकडून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव मयूर संजय खराडे (राहणार कल्याण पेठ जुन्नर )असे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे चार चाकी गाडीमध्ये गांजासारखा पदार्थ दिसला म्हणून पो हवा हांडे यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना माहिती देऊन मदत मागितली .त्यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड व इतर स्टाफ फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दोन पंचासह रवाना झाले घटनास्थळी पोलीस निरीक्षक गुंड साहेब यांनी आरोपी मयूर खराडे यांना NDPD कायदा कलम 50 प्रमाणे नोटीस देऊन टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी नंबर MH12ET3911 ची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये खाकी रंगाच्या चिकट टेपने गुंडाळलेले पाकीट मिळून आले त्यात गांजा सारखा उग्र वास येत असल्याने ते पाकीट ताब्यात घेतले तसेच बाजूला उभी असलेली एक्टिवा मोटरसायकल गाडी क्रमांकMH14CH6265 च्या हँडलला प्लॅस्टिकच्या पिशवीची पाहणी केली त्यात गांजासारखा उग्र वास येत असल्याने ती ताब्यात घेतली पंचायत समक्ष इलेक्ट्रिक काट्यावर त्याचे वजन केले असता त्याचे वजन 2.066 व 0.962 असे भरले म्हणून यातील आरोपी यांनी संगणमत करून सदरचे अमली पदार्थ गांजा अवैद्यरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने चार चाकी मध्ये व ॲक्टीव्हा मोटर सायकल मध्ये जवळ बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्याने सदर आरोपींविरुद्ध सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे.
अधिक तपास पोलिस निरिक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक संदीप मोरे तपास करत आहेत.