आषाढी वारी बाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चिंताग्रस्त. वारकऱ्यांची सुरक्षितता सर्वोच्च म्हणून निर्णय घेण्यास विलंब.

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

आळंदी,प्रतिनिधी: (आरिफ शेख) आषाढी वारी सोहळा काही तासांवर येऊन थांबला आहे. अशा परिस्थितीमध्ये पूरग्रस्त धोक्याची पार्श्वभूमी पाहता.वारकरी व भाविक यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे कामी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत. वारंवार बैठका घेऊन त्याबाबतच्या विशेष शक्यता तपासल्या जात आहेत.

माऊलींचे अश्व नेमके सुरक्षित ठिकाणी कसे आणावेत. ते आणत असताना दिंडेकरी, फडकरी,यांचे जीवावर पालखी वारी सोहळा असतो.त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.याबाबत सर्वकश निकष तपासून निर्णय घेणे कामी विलंब होत आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी येथील विशेष बैठका सत्र सुरू आहे. त्यामध्ये कसा मार्ग काढावा. निर्णय कसा घ्यावा. ज्यामुळे वारकरी,भाविकांना कुठल्याही संकटांना सामोरे जाऊ लागू नये.यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे.पूरग्रस्त परिस्थितीमुळे यात्रेचा ताण श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर आणखीन वाढला आहे.माऊलींच्या अश्व बाबत निर्णय जरी पुढील काळात झाला. तरी मात्र मानाच्या दिंड्या बोलवायच्या कुठे, प्रवास सुरू करताना दिंडेकरी,फडकरी, वारकरी यांना सुलभता कशी शक्य होईल. आणि अखंडित परंपरा कशी राखता येईल. यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चिंताग्रस्त आहे.

अशी अनौपचारिक चर्चा करत असताना विश्वस्त श्री योगी निरंजन नाथ महाराज यांच्याकडून कळत आहे. तसेच विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनीही पुढील काही तासांमध्ये याबाबत सुनिश्चित निर्णय येण्याची शक्यता आहे. अशी माहिती दिलेली आहे.मात्र सध्यातरी मोठ्या संकटांचा सामना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व्यवस्थापक यांना करावा लागत आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी पालखी सोहळा प्रमुख श्री एडवोकेट राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखने, विश्वस्त श्री ह भ प निलेश महाराज लोंढे. विश्वस्त.श्री ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील. विश्वस्त एडवोकेट रोहिणी आखाडे. या सर्वांकडून पालखी सोहळा प्रस्थान सुनियोजित आणि सुनिश्चित करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याची दिसते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *