
रोखठोक मराठी न्यूज
चाकण : (कमलेश पठारे ) काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चाकण आणि परिसरात रौद्ररूप धारण केले. सततच्या पावसामुळे पुणे–नाशिक महामार्गावरील काही भाग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.


महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना अनेक तासांचा मनस्ताप सहन करावा लागला.पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाली करत वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. पर्यायी मार्गांचा वापर, वाहतूक नियोजन आणि आवश्यक त्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळली.मात्र, स्थानिक नागरिकांनी या समस्येमागे नैसर्गिक ओढे आणि नाल्यांवरील अतिक्रमणे व बुजविण्यात आलेले जलमार्ग हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले.

ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असून त्यामुळे महामार्ग वारंवार जलमय होत आहे. ही परिस्थिती भविष्यात अधिक गंभीर स्वरूप धारण करून मोठ्या अपघातांना किंवा जीवितहानीला कारणीभूत ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे नैसर्गिक जलवाहिन्यांवरील अतिक्रमणे हटविणे, पावसाच्या पाण्याचा निचरा सक्षम करणे आणि दीर्घकालीन नियोजन करून पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
*पिंपरी चिंचवड वाहतूक विभाग*पावसाची स्थितीबाबत माहिती *वेळ १२.०० वाजता
*✳️*भोसरी वाहतूक विभाग*पाणी साठलेले ठिकाणे – 1. बाणाचा ओढा 2. माई वडेवाले चौक 3. क्लाऊड नाईन हॉटेल पाणी साठल्याने वाहतूक संथ गतीने चालू आहे.
✳️*बावधन वाहतूक विभाग*पाणी साठलेले ठिकाणे -1. राधा चौक2. ननावरे अंडरपास 3. भुगावपाणी साठल्या कारणाने वाहतूक संथ गतीने चालू आहे.
✳️*चाकण वाहतूक विभाग*पाणी साठलेले ठिकाणे -1. वाकी फाटा येथील वाहतूक पाणी साठल्या कारणाने बंद करण्यात आली आहे.
✳️*दिघी आळंदी वाहतूक विभाग* पाण्याखाली गेलेले पूल -1. दाभाडे सरकार चौक येथील पूल 2. इंद्रायणी नदी जुना पूल 3. इंद्रायणी नदी नवीन पूल 4. पुणे शहर हद्दीतील मरकळ गावातील पूल 5. सिद्धबेट पूल पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.श्री क्षेत्र आळंदी येथे सर्व प्रकारचे वाहने येण्यास मनाई करण्यात आली आहे.
✳️*वाकड वाहतूक विभाग*पाणी साठलेले ठिकाणे -1. ताथवडे अंडरपास (वाहतुकीस पूर्णपणे बंद)2. पुनावळे अंडरपास (वाहतूक संथ गतीने)3. रिव्हर व्ह्यू चौकातील पूल थेरगाव (वाहतुकीस पूर्णपणे बंद)
✳️*सांगवी वाहतूक विभाग*वाहतुकीस बंद केलेले ठिकाणी1. MM चौक येथून चिंचवड कडे येणारी वाहतूक बंद 2. साई चौक पाणी साठल्याने बंद 3. रहाटणी येथील पूल पाणी साठलेले बंद.
✳️*निगडी वाहतूक विभाग*पाणी साठलेले ठिकाणे -1. रिव्हर व्ह्यू चौक पूर्णपणे बंद 2. केशवनगर चिंचवड 3. रुद्र पार्किंग 4. भेळ चौक गीता वडापाव (महानगरपालिकेने मॅन हॉल उघडे असल्याने बंद केले आहे)
✳️*पिंपरी वाहतूक विभाग*पाणी साठलेले ठिकाणे -1. वल्लभनगर अंडरपास पूर्णपणे बंद 2. साई चौक अंडरपास पूर्णपणे बंद
✳️*हिंजवडी वाहतूक विभाग*पाणी साठलेले ठिकाणे -1. शनी मंदिर इंदिरा कॉलेज समोर पाणी साठले असल्याने बंद 2. ताथवडे अंडरपास हिंजवडी कडील बाजू पाणी साठल्याने बंद 3. सूर्या अंडरपास व सयाजी अंडरपास येथे पाणी साचले असून वाहतूक संथ गतीने चालू आहे.
✳️*म्हाळुंगे वाहतूक विभाग*वाहतूक बंद ठिकाण – 1. आळंदी फाटा येथून आळंदीकडे जाण्यास बंद 2. KBM कंपनी येथील नाला पूल खचला आहे वाहतूक बंद आहे.
✳️*चिखली वाहतूक विभाग*वाहतूक बंद ठिकाण1. हवालदार वस्ती ते आळंदी 2. डायमंड चौक येथून मोईकडे जाण्यास बंदी3. चिखली कमान ते चिखली स्मशान रोड बंद पाणी साठलेली ठिकाणलक्ष्मी चौक कुदळवाडी पाटील नगर जाधव सरकार चौक
✳️*देहूरोड वाहतूक विभाग*- वाहतूक बंद ठिकाणसेंट्रल चौकातील वाहतूक बदल सुरू केले आहे – पाणी साठलेले ठिकाणशिंदे पेट्रोल पंप येथील दोन्ही सर्विस रोड पाण्याखाली
✳️*तळेगाव वाहतूक विभाग*- पाणी साठलेले ठिकाणहॉटेल इंद्रायणी घोराडेश्वर मंदिर समोर हॉटेल थंड मामला येथे डोंगरातून आलेले पाणी तळेगाव चाकण रोड वरील देव फाटा येथे. (नगरपरिषदेकडील मनुष्यबळ येथे कामकाज करीत आहे)