
रोखठोक मराठी न्यूज, राजगुरूनगर : वीजेचा लपंडाव थांबवा, अशी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शाखा अभियंता, चास यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
किसान सभेने निवेदनात म्हटले आहे की, कान्हेवाडी, कडधे व अन्य गावांमध्ये सातत्याने वीज जात असून विजपुरवठा सुरळीत करावी, अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच स्मार्ट मीटर सक्ती करु नये, अशीही मागणीही करण्यात आली आहे.यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र थोरात, जिल्हा कमिटी सदस्य अमोद गरूड, आनंदा कोबल, नवनाथ मोरे उपस्थित होते.