समाधी मंदिरातील भाविकांनी दान केलेल्या रकमेची चोरी कर्मचाऱ्याला अटक

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

आळंदी (प्रतिनिधी,आफ्रीन आरिफ शेख) संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पवित्र अधिक महिना सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दान माऊलींच्या दारात भाविक अर्पण करत आहेत. मात्र अशा पवित्र महिन्यामध्ये माऊलींच्या दानपेटीतील रक्कम चोरण्याचा श्रद्धेला काळिंमा फासण्याचा प्रकार आरोपी विशाल बाळ वारुळे (वय 33) याने केलेला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की विशाल बाळ वारुळे हा माऊलींच्या मंदिरामध्ये सेवक पदावर रुजू होता. दररोज दानपेटीत जमा झालेली रक्कम ही कॅशियर कडे जमा करण्याच्या अनुषंगाने काढली जाते.यावेळी संधीचा फायदा घेत आरोपी विशाल वारुळे यांनी दिनांक 12 मे ते 13 मे आणि 16 मे रोजी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या सुमारास कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने चलाखिने दानपेटीतील रक्कम काढताना नजर चुकवून पैसे पोत्यामध्ये भरल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी विशाल वारुळे हा त्या पोत्यांवर प्लास्टिकचे ट्रे ठेवत आणि कॅशियर महेश गोपाळ गोखले यांच्याकडे दानपेटीतील रक्कम जमा करायला जात असताना मोठ्या शिताफीने प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे या आरोपीने सुमारे 15000 रुपये दानपेटीची रक्कम लांबवल्याचे निदर्शनात आले आहे.

याबाबत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी आळंदी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिले आहे पोलिसांनी सदर फिर्यादीची तात्काळ दखल घेत आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम 306 अन्वये गुन्हा नोंदवत अटक केलेली आहे सदर आरोपी हा कॅशियर रूम मध्ये रक्कम जमा करण्यासाठी जात असताना चोरलेली रक्कम कपाटाच्या मागे लपवत असे आणि त्या रकमेवर फुलांचे हार टाकून जाताना हार घेऊन जात आहे.असा भास निर्माण होईल अशी शिताफी करत तेथून पसार होत असे. याबाबत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने गंभीर दखल घेतली असून पोलिसांना याबाबत कठोर पावले उचलावी असे कळवले आहे. दरम्यान आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून आरोपी आळंदी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *