विवाहित महिलेचा पतीने केला गळा आवळून खून

Spread the love

रोखठोक मराठी बातम्या

जुन्नर (प्रतिनिधी ) जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे महांळुंगे येथील विवाहिता रुपाली नवनाथ पारखे हिचा तिच्या पतीने खून केल्याची घटना घडली ,पोलिसांनी आरोपी नवनाथ बाजीराव पारखे याला अटक केली.

याबाबतची हकिकत अशी की, शनिवारी दुपारी शेतातील गोठ्यात नेवून रुपाली हिचा दोन्ही हाताने गळा दाबून आरोपीने तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या गळ्याला दावे बांधून (दोरखंड) गोठ्यातील लोखंडी पाईपाला लटकावून तिने गळफास घातला असे भासविले .याबाबत रुपाली हिचा भाऊ विकास वसंत पवार ( रा. बल्लाळवाडी) यांनी पोलिसांकृडे फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक तपास सपोनि गटकूळ करत आहेत.घटनास्थळी उपविभागिय पोलिस अधिकारी धनंजय पाटिल व पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी भेट दिली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *