दक्षिण महाळुंगे MIDC पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २३ गुन्ह्यांचा उकल करून ५२ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन

Spread the love

रोखठोक मराठी बातम्या

चाकण : (कल्पेश अ. भोई) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत २३ विविध गुन्ह्यांचा छडा लावला आहे.

या कारवाईत जप्त करण्यात आलेला सुमारे ५२ लाख ९१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल शनिवारी (दि. १६ मे २०२६) एका विशेष कार्यक्रमात मूळ मालकांना परत करण्यात आला.

चोरीला गेलेले सोने, वाहने आणि रोख रक्कम पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.

पोलीस आयुक्तांच्या सुचनांना यश पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती वाहन चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कडक सूचना दिल्या होत्या. गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने विविध ठिकाणी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने शोधमोहीम राबवून २३ गुन्हे उघडकीस आणले.काय काय मिळाले परत?पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या अनेक मोटारसायकली, सोन्याचे मौल्यवान दागिने, मोबाईल संच, एक टेम्पो आणि रोख रक्कम असा एकूण ५२ लाख ९१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व माल मूळ मालकांना (फिर्यादींना) सन्मानपूर्वक परत करण्यात आला.पोलीस उपायुक्तांच्या हस्ते मालमत्ता वाटप दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती श्वेता खेडकर यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. आपले चोरीला गेलेले दागिने आणि मेहनतीचे पैसे सुरक्षित परत मिळाल्याने अनेक नागरिकांनी भावूक होत पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले.

या पथकाने केली यशस्वी कामगिरीही महत्त्वाची

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली आणि पोलीस उप आयुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासाचे मुख्य काम सहाय्यक पोलीस आयुक्त (महाळुंगे विभाग) सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे यांच्या नेतृत्वाखाली मपोहवा अर्चना काळे, दत्तात्रेय कुंभार तसेच दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *