मुख्याध्यापक वैभव मारुती बेंडाले यांना पी.एच.डी. प्रदान

Spread the love

रोखठोक मराठी बातम्या

चाकण (प्रतिनिधी)श्री संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय सोळू या प्रशालेचे मुख्याध्यापक वैभव मारुती बेंढाले यांनी गणित विषयाच्या अध्ययन पद्धतीबाबत संशोधन करून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.  या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. डॉ.वैभव बेंडाले यांनी गणित विषयात पदवित्तर एम.फिल, सेट, एम.एड आदि पदव्या मिळवल्या  आहेत.

गेली २६ वर्षे मुख्याध्यापक पदी सेवा करत  शिक्षण व डॉक्टरेट पदवीचे शिक्षण बेंडाले यांनी घेतले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे ” गणित विषयातील अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास करण्यासाठी सहकार्यात्मक अध्ययन कार्यक्रमाची निर्मिती ” या विषयावर  बेंडाले यांनी डॉक्टरेट पदवीचे संशोधन केले. त्यासाठी रिसर्च गाईड म्हणून डॉ सरिता गाडेगावकर यांनी मार्गदर्शन केले. बेंढाले यांनी माध्यमिक विद्यालयात प्रमुख म्हणून कार्यरत असताना प्रशाळेतील  दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित विषयाचे मार्गदर्शन  करून १०० टक्के विद्यार्थी यशस्वी केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *