
रोखठोक मराठी न्यूज,चाकण (प्रतिनिधी) : येथील चाकण विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रेय गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्षा राजश्री राम गोरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवड प्रक्रिया पार पडली.राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. सोसायटीचे सचिव अरुण धाडगे यांनी त्यांना सहकार्य केले.

यावेळी माजी अध्यक्षा राजश्री राम गोरे, उपाध्यक्ष राजेंद्र खेडकर, जगदीश मेदनकर, बाबाजी राक्षे, अशोक परदेशी, अशोक कड, बाळासाहेब पठारे, शोभा कड, अशोक गोरे, अभिषेक मुटके, धीरज आगरकर यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रेय गोरे यांनी शेतकरी बांधवांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे व कटिबद्धतेने काम करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच सोसायटीच्या विकासासाठी सर्व संचालक व सभासदांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.