
रोखठोक मराठी न्यूज
चाकण (प्रतिनिधी ) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. सलग दोन दिवस चाललेल्या या धडक मोहिमेत सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावरील ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले असून, त्यामुळे अनधिकृत पत्राशेडधारक आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीमपीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या थेट नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ व १४ जुलै रोजी ही धडक मोहीम राबविण्यात आली. कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने अत्यंत चोख आणि सूक्ष्म नियोजन केले होते.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:• प्रचंड बंदोबस्त: १,००० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, एमएसएफचे जवान आणि सुरक्षारक्षकांच्या फौजफाट्यासह ही कारवाई पार पडली.
• यंत्रणांचा ताळमेळ: पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड पोलीस, महावितरण, आरोग्य विभाग आणि खेड पंचायत समिती यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही मोहीम शांततेत पार पडली
.• कडक संदेश: या कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.कोट: “पीएमआरडीएच्या हद्दीत बेकायदेशीर पत्राशेड किंवा बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये. आगामी काळातही ही कडक कारवाई अशीच सुरू राहील.”
• डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए