गरजू विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करुन राजगुरूनगर येथे राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन.

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज (राजगुरूनगर) स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या सामाजिक संघटनेच्या यांच्यावतीने राजगुरूनगर येथे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरा कारण्यात आली. यावेळी संघटनेचे /संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच वृक्षरोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी हरेशभाई देखणे यांनी सांगितले की राजश्री शाहू महाराज यांनी करवीर संस्थानात मागासवर्गीय व बहुजन समाजासाठी 50 टक्के आरक्षणाची घोषणा केली होती. तसेच शिक्षणाचा प्रसार केला.यांनी यावेळी तसेच कैलास केदारी व कु. समीक्षा विकास शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमवेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलास केदारी, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विकास शिंदे, पोलीस पाटील संघटनेच्या पुणे जिल्हा संघटक निर्मलाताई देखणे, जिल्हा प्रवक्ते ईश्वर इंगळे, खेड तालुका संपर्कप्रमुख हरीश कांबळे, मामू कहाणे, सविता केदारी इ मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलास केदारी यांनी केले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *