छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजही सर्वांसाठी प्रेरणादायी

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

राष्ट्र निर्माणात युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी भाजपा युवा मोर्चा पुढाकार घेणार.भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाही

जुन्नर (प्रतिनिधी ) भारतीय जनता युवा मोर्चातर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या युवाशक्ती जागर यात्रे दरम्यान भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा शिवजन्मभूमी जुन्नर येथे दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्या दरम्यान युवकांशी थेट संवाद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन करून संघटनात्मक कामकाजावर चर्चा केली.

याप्रसंगी भाजपनेच्या आशा बुचके, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे, पं.स. सदस्य संजय वऱ्हाडी, रोहित परदेशी, सचिन खत्री, अनिल मेहेर, दीपेश परदेशी आदींसह भाजपा विश्व हिंदू परिषद बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृष्णराज महाडिक मार्गदर्शन करताना म्हणाले, राज्य शासनाकडून पर्यावरण संरक्षण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या आव्हानांवर मात करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात भारत आज जगातील अग्रगण्य देशांच्या यादीत आपले स्थान अधिक बळकट करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत असून, भारतानेही या नव्या तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे स्वीकार केला आहे.

जगातील इतर देशांच्या तुलनेत २०१४ पूर्वीचा भारत आणि ‘आजचा भारत यामध्ये लक्षणीय बदल दिसून येतो. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, आर्थिक प्रगती, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि जागतिक स्तरावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा यामुळे देशाने विकासाचा नवा अध्याय लिहिला आहे.राज्यातील युवकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी आणि युवाभिमुख योजनांची माहिती देणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करणे, कौशल्य विकास आणि उ‌द्योजकतेस प्रोत्साहन देणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. तसेच युवकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे कामही या माध्यमातून केले जाणार आहे.

या दौऱ्याच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना राष्ट्र‌निर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करणे यावर भर दिला जाणार आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *