४८ तासात सन्माननीय तोडगा काढण्याचे आश्वासन ; उमेश रानवडे यांचे उपोषण मागे माऊलींचे रथास बैलजोडी सेवेची मागणी

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याची सेवा उमेश रानवडे यांना मिळावी अशी मागणी करीत कमला एकादशी दिनी महाद्वार चौकात उपोषण सुरुवातीस बैलजोडी घेऊन येत त्यांनी उपोषण सुरू केले होते. बैलजोडीची सेवा या वर्षी रानवडे कुटुंबा कडून आहे.

यात आलेल्या अर्जातून बैलजोड निवड समितीने हर्षवर्धन रानवडे, तुळशीराम रानवडे यांचे नावे संमती देऊन त्या प्रमाणे पत्र दिले होते. या मुळे उमेश रानवडे यांनी या सेवेची संधी कुटुंबास मिळावी अशी आग्रही मागणी करून उपोषण सुरू केले होते.

अखेर चार वाजता बैलजोड निवड समिती अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, विलास घुंडरे पाटील, रामदास भोसले, शिवाजीराव रानवडे, ज्ञानोबा वहिले, माजी अध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, व्यवस्थापक माऊली वीर, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे यांचे उपस्थितीत संवाद होऊन चर्चा झाली. या वेळी पुढील ४८ तासांत एक बैठक घेण्याचे निर्धारित करून या कालावधीत सन्माननीय तोडगा काढण्याचे आश्वासनावर उमेश रानवडे यांनी आपले उपोषण जलपेय घेऊन मागे घेतले.

दरम्यान आळंदीकर ग्रामस्थ बैल जोड निवड समितीने देवस्थान कडून प्राप्त पत्रव्यवहारात आपले पत्र आळंदी पोलिस स्टेशन आणि आळंदी देवस्थान यांना दिले आहे. या बैठकी दरम्यान उमेश रानवडे यांनी आपल्या बेलजोड सेवा पालखी रथास सेवा देण्याची संधी मिळावी अशी मागणी लावून धरत संवाद साधला. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी सुसंवाद साधून उपोषण शांततेत जलपेय देऊन मागे घेण्यास चर्चेत यशस्वी संवाद साधला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *