चित्रकर्मींच्या हक्कांसाठी ‘चित्रकर्मी पॅनल’ला जाहीर पाठिंबा : भगवान मेदनकर

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज,चाकण (प्रतिनिधी ) मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रकर्मींचे हक्क, त्यांचे प्रश्न आणि मराठी चित्रपटसृष्टीचे उज्ज्वल भवितव्य लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक २०२६ मध्ये ‘चित्रकर्मी पॅनल’ला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि दिग्दर्शक-सिनेकर्मी सतीश रणदिवे यांनी केलेल्या विनंतीचा आदर राखत अभिनेते, चित्रपट निर्माते, प्रोड्युसर, भगवान मेदनकर यांनी तसेच त्यांच्या पॅनलमधील सर्व सहकाऱ्यांनी ‘चित्रकर्मी पॅनल’ला अधिकृत पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील चित्रकर्मी यांच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. मराठी चित्रपटसृष्टीसमोरील आव्हानांचा सामना करताना चित्रकर्मींचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे आणि उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे हेच या पाठिंब्यामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीत ‘चित्रकर्मी पॅनल’ला मिळालेल्या या पाठिंब्यामुळे निवडणुकीतील वातावरण अधिक रंगतदार झाले असून, चित्रपटसृष्टीतील विविध घटकांमध्ये याची चर्चा सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *