पेट्रोल पंपांवर गोंधळ, रांगा

Spread the love

रोखठोक मराठी न्यूज

पुणे (वृत्त सेवा ) : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असून भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालीआहे.त्यातच अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुडवडा जाणवत असून बहुतांश पंपावर इंधन भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

अनेक पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याने ग्राहकांचा मनःस्ताप बघायला मिळतो आहे. सोमवारी देखील पुणेकरांना या मनःस्तापाचा सामना करावा लागल्याचे चित्र होते.

पिंपरी चिंचवड शहरातील सोमवारी जवळपास ८० टक्के पेट्रोल पंप पेट्रोल पंप चालकांनी बंद होते. पेट्रोल पुरवठा करणाऱ्या हिंदुस्तान पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम सारख्या सरकारी कंपन्यांकडून पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा न झाल्याने, पेट्रोल पंप बंदठेवण्याची वेळ पेट्रोल पंप मालकांवर ओढवली.

राज्य सरकार तसेच पेट्रोल पंप मालकांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक पेट्रोल पंप बंद ठेवल्याने याचा मोठा फटका पिंपरी चिंचवड शहरातील नोकरदार आणि कामगारांना पडला.तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

तर तिकडे वाशिममध्ये पेट्रोल मिळवण्याच्या नादात मारामारी झाल्याची घटना घडली आहे. चिखली येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप चालक डिझेल देत नसल्याने शेतकऱ्यांनी ठिय्या केला.

सध्या जिल्हाभरात 165 पेट्रोल पंप पासून निम्म्यापेक्षाहून अधिक पेट्रोल पंप हे इंधनाअभावी ‘नो स्टॉक’ असल्याने बंद आहेत. तर ज्या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध असते तिथे वाहनधारकांच्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी राडा होत आहे. इंधन न मिळाल्यास मान्सूनपूर्व शेतीची कामे होणार नाहीत व त्यामुळे आमची शेती पडीत पडण्याची भीती एका शेतकऱ्याने बोलून दाखवली.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *