
रोखठोक मराठी बातम्या
पुणे,(वृत्त सेवा ) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ परीक्षेत पात्र उमेदवारांना १८ मे ८ जून २०२६ या कालावधीत प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह आपण परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
महाटीईटी- २०२५ परीक्षेचे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. १ (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. २ (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेला होता.