ग्रँड सेंट्रल सोसायटीची वार्षिक सभा गोंधळात; अध्यक्षांनी सभा अर्धवट सोडल्याचा सभासदांचा आरोप

Spread the love

सलग तीन बैठकांना गैरहजर समिती सदस्यांवर कारवाईची मागणी; सहाय्यक निबंधकांकडे तक्रार करणार

रोखठोक मराठी न्यूज

चाकण (अविनाश राळे पाटील ) : पुणे-नाशिक महामार्गावरील द ग्रँड सेंट्रल कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २७) गोंधळात संपली.

कमिटी मधील १६ कमिटी सदस्यापैकी ११ कमिटी सदस्य मीटिंग साठी उपस्थित होते.सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न देता अध्यक्ष दीपक कौटकर सभा अर्धवट सोडून निघून गेले, असा आरोप सभासदांनी केला आहे. यामध्ये अध्यक्षांवर त्यांना कुठलीही जमा खर्चाची जुळवाजुळव करण्यात अपयशी पडताना ते दिसून आले. या अभ्यासाला व या प्रश्नांना ती उत्तर देण्यात संपूर्णपणे अपयशी ठरताना ते दिसून आले संस्थेच्या नोंदणीकृत उपविधीनुसार, समितीचा जो सदस्य रजा न घेता समितीच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहतो, त्याचे समिती सदस्यत्व संपुष्टात येते. व्यवस्थापक समितीने आपल्या पहिल्याच बैठकीत याबाबत ठरावही केला होता. मात्र काही समिती सदस्य सलग तीन किंवा त्याहून अधिक बैठकांना गैरहजर असल्याचे समितीच्या इतिवृत्त पुस्तकातून दिसून आल्याचे सभासदांनी सांगितले.

सभेतील ऐनवेळच्या विषयांमध्ये उपस्थित सभासदांनी बहुमताने उपविधीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यांनी संबंधित सदस्यांची नावे जाहीर करावीत आणि त्यांनी रजा घेतली असल्यास तिचा पुरावा दाखवावा, अशीही मागणी केली. मात्र अध्यक्षांनी नावे जाहीर केली नाहीत आणि रजेचा कोणताही पुरावा दिला नाही. उलट संबंधित सदस्यांना आणखी एक संधी देण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. सभासदांनी आग्रह धरल्यावर “सभा संपली” असे जाहीर करून ते सभास्थानातून निघून गेले असे सभासदांनी सांगितले.

यामध्ये अध्यक्षांचे काही हित संबंध व आर्थिक व्यवहार आहेत की काय असे एक प्रकारचं मोठ्या प्रश्नचिन्ह या सोसायटीतील सभासदांना लागला आहेयामुळे सभासदांनी ऐनवेळच्या चर्चेसाठी दिलेल्या लेखी अर्जांवर चर्चाच होऊ शकली नाही. आता या प्रश्नांसाठी पुढील वार्षिक सभेची वाट पाहावी लागणार असल्याने संस्थेच्या ३४२ सभासदांची गैरसोय झाली आहे, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अंदाजपत्रकाचा तपशील सभेत मांडला गेला नाही, तरीही तो मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले, असा आक्षेपही सभासदांनी घेतला आहे.

“सभेत बहुमताने केलेली मागणी डावलून अध्यक्षांनी सभा अर्धवट सोडली. उपविधीचे तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्याचे, पालन व्हावे एवढीच आमची मागणी आहे,” असे एक मुखाने सभासदांनी सांगितले.सोसायटीचे निर्णय जर अध्यक्ष हुकूमशाही पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर सोसायटीची मीटिंग फक्त नावाला घेऊन कोणाची हितगुज सांभाळतात याबाबतीचा सर्वात मोठे प्रश्नचिन्ह सोसायटीतील सर्व शॉप धारकांना पडले आहे तरीहीया प्रकाराबाबत खेड येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सभासदांनी सांगितले. प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशी मागणीही ते करणार आहेत


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *